बेळगाव : पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून लुबाडण्याचा प्रयत्न प्रकार अनेक वेळेला झालेला पाहायला मिळाला आहे. आता पुन्हा एकदा माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे. एम. कालीमिरची व निवृत्त पोलीस निरीक्षक डी.सी. लकण्णावर यांच्या नावे देखील फेसबुकवर बनावट खाते तयार करण्यात आले आहे.
याआधी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख राहिलेले संजीव पाटील यांच्या नावाने देखील फेसबुक वर बनावट खाते निर्माण करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा पोलीस निरीक्षकांच्या नावाने बनावट खाते तयार करून पोलीस दलाला आव्हान देण्यात आले आहे.
कालीमिरची यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या बनावट फेसबुक खात्यावरून त्यांचे फेसबुक फ्रेंड असलेल्यांना संदेश पाठवले जात आहेत. ज्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्याचा बंगला आणि घरातील फर्निचर विकायचे असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात काहींनी कालीमिरची यांना फोन करून याबाबत विचारणाही केली, त्यामुळे बनावट खाते तयार करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. असे कोणतेही संदेश कोणाला पाठविले नसून ते बनावट असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच बनावट खाते ब्लॉक करावे असेही कळवले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta