बेळगाव : अनंतशयन गल्ली येथील सरस्वती महिला मंडळाच्या पहिल्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके उपस्थित होत्या.
त्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मंडळातील सर्व महिलांनी एकत्रित येत दांडिया, गरबा, हादगा यासह अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी विजेत्या स्पर्धकांना फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाताई बेनके यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व महिलांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि हे मंडळ अशाच प्रकारे पुढे येऊ अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरस्वती महिला मंडळाच्या अध्यक्षा रेणुका अलगवाडी, उपाध्यक्ष राधिका गौरगोंडा, सुषमा दोड्डनावर, सरोजा बसरगी, रेखा लाली, संपदा कुलकर्णी, स्वाती गौरांना, सविता गौरांना, सुजाता गौरगुंडा, लक्ष्मी कुलकर्णी यांच्यासहित महिला व सदस्य उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta