बेळगाव : हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अकरावा स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
१७ नोव्हेंबर २०१२ हा दिवस मराठी माणूस कधीही विसरू शकत नाही. कारण याच दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर प्रत्येक वर्षी या दिवशी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जातो. तसंच बाळासाहेब ठाकरे हे एखाद्या वलयाप्रमाणे आजही सीमाभागाच्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये त्यांचं स्थान राखून आहेत. हे प्रकर्षानं यावेळी दिसून येतं.
बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग यांच्या वतीने स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी सकाळी गणेशपूर येथील मध्यवर्ती शिवसेना कार्यालयामध्ये बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि उपशहर प्रमुख राजू तूडयेकर यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी आपल्या भाषणात बाळासाहेबांबद्दल माहिती सांगून आपले विचार व्यक्त केले. यावेळी “अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे” या घोषणा देण्यात आल्या. तसेच यानिमित्त ज्येष्ठ महिला आणि पुरुष अशा 25 जणांचा शाल, श्रीफळ देऊन संघटक तानाजी पावशे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती मंगला खामकर, रेखा हिरोजी, लक्ष्मीबाई देवरवाडी, मंजुळा देवरवाडी, गीता दळवी वैशाली खामकर, इंदिरा घाटकर, प्रतिभा लोकरे, शंकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश राऊत, प्रकाश हेब्बाजी, मयुरेश काकतकर, राहुल नार्वेकर, यश काणेकर, विजय खामकर आणि इतर शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते.