Monday , December 23 2024
Breaking News

प्रथमोचार वैद्यकीय सहाय्यक संघटनेच्या मागण्यांसाठी आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक राज्य ग्रामीण प्रथमोपचार डॉक्टर संघटनेच्या मागणीसाठी आज बेळगाव येथील सुवर्णसौध परिसरात आंदोलन करण्यात आले.

यावेळी कर्नाटक राज्य ग्रामीण प्रथमोपचार डॉक्टर्स असोसिएशनचे सचिव आर. आर. पाटील म्हणाले की, आमच्या संस्थेचे सदस्य ग्रामीण भागात आरोग्य, वाहतूक सेवा यासारख्या योग्य पायाभूत सुविधांपासून वंचित असलेल्या ग्रामीण भागात आणि झोपडपट्टीत वैद्यकीय प्राथमिक उपचार करत आहेत. अनेक दशकांपासून आमच्या संघटनेचे राज्यातील सुमारे 25 जिल्ह्यांमध्ये सदस्य आहेत.आम्ही सुमारे 5-10 वर्षांपासून कुशल डॉक्टरांच्या हाताखाली प्रथमोपचार सेवा देत आहोत आणि ग्रामीण भागातील लोक आणि कुशल डॉक्टर यांच्यातील सेतू म्हणून आमची प्राथमिक उपचार सेवा देत आहोत. परंतु 2007 मध्ये K.P.M.E. कायद्यानुसार आमच्याकडे कोणतेही वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र नसल्यामुळे सरकारी अधिकारी, आम्हाला बनावट समजून आमची सेवा रोखत आहेत. त्यामुळे आपले जीवन कठीण आहे. कारण आमच्या संस्थेला आंध्र/तेलंगणा मॉडेलवर प्रशिक्षण आणि मान्यता देण्यात यावी, आम्ही सुमारे 13 वर्षांपासून संघटनेच्या संघर्षातून सरकारकडे मागणी करीत आहोत.यावेळी कर्नाटक राज्य ग्रामीण प्रथमोपचार डॉक्टर संघटनेचे राज्य अध्यक्ष एम. एस. कद्दिमनी यांच्यासह कर्नाटक राज्य ग्रामीण प्रथमोपचार डॉक्टर संघटनेचे शेकडो सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *