बेळगाव : बेळगाव परिसरातील उद्योगधंदे हे प्रामुख्याने बहुजनांच्या हातात होते. येथील कापड उद्योग, बेकरी व्यवसाय, सोने-चांदी व्यवसाय, उद्मबाग येथील फौंड्री, लेथ मशीन हे सगळे व्यवसाय सांभाळणारी सर्व आपलीच माणसं होती आणि आमचा मराठा समाज शिक्षित, व्यवसायिक, व्यवहारीक आणि आर्थिकदृष्ट्या बलवान व्हावा, यासाठी मराठा समाजातील नेते ‘राष्ट्रवीर’कार शामराव देसाई, बहिर्जी शिरोळकर आणि संत मेलगे यांनी तुकाराम बँक, मराठा बँक अशा अनेक आर्थिक संस्थांची स्थापना केली आणि मराठा समाज सर्वतोपरी सुदृढ बनवला. त्यांच्याच प्रेरणेतून ‘नवहिंद सोसायटी’चे कामकाज सर्व स्तरातील लोकांसाठी आशादायक आहे, अशा मराठा समाजातील संस्थांना मराठा समाजाने पाठबळ द्यावे, असे आवाहन मराठा समाजाचे अध्यक्ष आणि तुकाराम बँकेचे चेअरमन श्री. प्रकाश मरगाळे यांनी ‘नवहिंद दिनदर्शिके’चे प्रकाशन करताना केले. प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर हे होते.
प्रारंभी छ. शिवाजी महाराज यांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उपस्थिततांचे स्वागत व प्रास्ताविकात चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर श्री. प्रकाश मरगाळे आणि क्रेडाईचे खजिनदार श्री. राजेंद्र मुतगेकर यांच्या हस्ते ‘नवहिंद दिनदर्शिके’चे प्रकाशन करण्यात आले.
क्रेडाईचे खजिनदार श्री. राजेंद्र मुतगेकर यांनी, येत्या काळात अनेक संधी उपलब्ध होणार असून नवहिंद संस्थेने प्रत्येक संधीचा लाभ घेऊन संस्थेबरोबर समाजाची उन्नती करावी.
याप्रसंगी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, न्यू. नवहिंद मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन नारायण जाधव, धनश्री सोसायटीचे चेअरमन श्री. एस. डी. जोशी, आर्किटेक्ट सुनील पवार, प्रियदर्शनी नवहिंद महिला पतसंस्थेच्या चेअरपर्सन सौ. माधुरी पाटील, नवहिंद महिला प्रबोधन केंद्राच्या अध्यक्षा सौ. नम्रता पाटील, प्रदीप मुरकुटे, सी. बी. पाटील, रूपा धामणेकर, वर्षा अष्टेकर, सरिता जाधव, लता बस्तवाडकर, कीर्ती ठोंबरे, वाय. एन. पाटील, नारायण बस्तवाडकर, दत्ता उघाडे, संभाजी कणबरकर, श्रीधर धामणेकर, दशरथ पाटील, वाय. सी गोरल, आनंद पाटील, परशराम कंग्राळकर, आनंद मजकुर, सुरेखा सायनेकर, सुलभा पाटील, वैशाली मजुकर, सुनिता कणबरकर, शितल बस्तवाडकर, भिमराव पुण्याण्णावर, आर. वाय. ठोंबरे, संतोष अष्टेकर, प्रमोद जाधव, पंकज जाधव, नितीन कुगजी, सुधीर माणकोजी, पी ए. पाटील, प्रताप पाटील, हणमंत पाटील, दिनेश पाटील, वाय. पी. देसूरकर, ए. ओ. मॅनेजर विवेक मोहिते, रिकव्हरी हेड जे. एस. नांदुरकर, मदन पाटील, जोतीबा शहापूरकर, संदीप बामणे, संगीता कुगाजी, सागर जाधव, रमाकांत देसाई, सुमेश चौगुले, महांतेश अलगोंडी, निलेश नाईक, नवहिंद क्रीडा केंद्राचे कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हा. चेअरमन अनिल हुंदरे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन माजी चेअरमन श्री. उदय जाधव यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta