काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आमदार नागराजू यादव
बेळगाव : समाजातील युवक-युवतींनी उच्च शिक्षणाचे महत्त्व जाणून घ्यावे. विज्ञानवादी समाज निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. समाज सर्व पातळीवर सुदृढ बनवण्याची जबाबदारी सर्व समाजातील विविध संस्थांनी घेतली पाहिजेत. सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती साधताना ‘नवहिंद सोसायटी’चे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन प्रिव्हिलेज कमिटीचे अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आमदार श्री. नागराजू यादव यांनी नवहिंद सोसायटीला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी केले.
नवहिंद सोसायटीचे चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर यांनी संस्थेच्या सहकार क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व्हा. चेअरमन श्री. अनिल हुंदरे केले. याप्रसंगी मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्री हलगेकर आवर्जून उपस्थित होत्या.
यावेळी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, संचालक उदय जाधव, सी. बी. पाटील, संभाजी कणबरकर, रिकव्हरी हेड श्री. जे. एस. नांदुरकर, एच.ओ. मॅनेजर विवेक मोहिते, अनिल पाटील उपस्थित होते.