
बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव ग्रामीण कार्यालयात माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा सुशासन दिन आज सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, बेळगाव ग्रामीण अध्यक्ष धनंजय जाधव, भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत आणि धनश्री सरदेसाई या मान्यवरांसह प्रमुख वक्ते म्हणून गोमाजी गोसावी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार संजय पाटील, गोमाजी गोसावी यांच्यासह इतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास भाजप बेळगाव ग्रामीणचे सचिव सुभाष पाटील, संदीप देशपांडे आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यल्लेश कोलकार यांनी केले. शेवटी नितीन चौगुले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta