Friday , March 6 2026
Breaking News

जिल्हा प्रशासनातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खाते, जिल्हा ग्राहक आयोग कायदेशीर मेट्रोलॉजी विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जनसंपर्क विभाग, अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता खाते, डीसीआयसी आणि इतर खात्यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन -2023 आज गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज सकाळी या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. ई-कॉमर्स आणि डिजिटल व्यापारी युगातील ग्राहक संरक्षण हा आजच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाचा मुख्य विषय होता. अतिरिक्त जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोग, बेळगावचे अध्यक्ष संजीवकुमार व्ही. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमास उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी नितेश पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक विवाद निवारण आयोग, बेळगावच्या सदस्या श्रीमती सुनंदा एस. कडकोल्लीमाथा, सदस्य पी. मुरलीमोहन रेड्डी, गिरीश पाटील, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद आदी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर जिल्हाधिकारी पाटील यांच्यासह व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तयार केलेल्या हस्त पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

व्यासपीठावरील मान्यवरांच्या भाषणानंतर ॲड. एन. आर. लातूर यांनी ग्राहक कायदा आणि ग्राहक रक्षण यावर माहितीपूर्ण विचार मांडले. याप्रसंगी सार्वजनिक शिक्षण खाते बेळगावचे उपसंचालक मोहनकुमार हंचाटे पदवी पूर्व शिक्षण खाते बेळगावचे उपसंचालक एम. एम. कांबळे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, बेळगावच्या सदस्य श्रीमती पूर्णिमा पट्टणशेट्टी, अंगडी इन्स्टिट्यूट अखो टेक्नॉलॉजी एमबीए विभागचे डॉ. सूर्यकुमार आदींसह विविध सरकारी खात्याचे अधिकारी, कर्मचारी, कायदा शाखेचे विद्यार्थी -विद्यार्थिनी आणि निमंत्रित बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *