बेळगांव : भारतीय जुन्या पारंपरिक खेळांना पुन्हा उजाळा देत क्रीडाभारतीने नव्या दमाच्या विद्यार्थ्यांना जुन्या खेळाचे अवगत करून दिल्याबद्दल क्रीडा भारतीचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे मत येथील संत मीरा शाळेच्या मैदानावर क्रीडा भारती आयोजित स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी यांनी काढले. उद्घाटनाला प्रमुख पाहुणे राघवेंद्र कुलकर्णी, सेवाभारती प्रांत प्रमुख शिल्पा वेर्णेकर, जयश्री काकतकर, क्रीडाभारती राज्य अध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक शिंत्रे, जिल्हा संयोजक विश्वास पवार या मान्यवरांच्या हस्ते भारतमाता फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बापू देसाई, जयसिंग धनाजी, उमेश बेळगुंदकर, परशराम मंगनाईक, एच. व्ही. रोगी, एन. एन. कातकर, शंकर कोलकार, चंद्रकांत पाटील, पूजा मुचंडीकर, मयुरी पिंगट, अनंत पाटील आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे.
तीन पायाची शर्यत 14 वर्षाखालील मुले
प्रथम समर्थ माळवी, हेमांगयादव, दुसरा रियाज किल्लेदार, सुरज सावंत, तिसरा आदित्य नाईक, श्रवण मुतकेकर, मुली प्रथम स्वरा शिंदे, द्वितीय भाग्यश्री बी, दर्शिका पाटील, सिद्धी मणीकेरी, द्वितीय सलोनी गोरल, राणी बाळेकुंद्री, तिसरा कुसुम कणबरकर, सानिका पाटील.
माध्यमिक मुले प्रथम ओमकार देसाई भूषण पाटील, द्वितीय प्रकाश एस वाय,भरमाप्पा दलवाई, तिसरा प्रीतम पाटील, राज बंड्डीवडर. मुली गट स्मिता काकतकर प्रियंका पाटील, द्वितीय वैभवी बुद्रुक अपूर्वा नाईक, तिसरा. दिप्ती प्रधान, प्राची देसाई.
पोत्यात पाय घालून पळणे
प्राथमिक गट मुले प्रथम राज बंडीवड्डर, द्वितीय समर्थ माळवी तिसरा रियाज किल्लेदार, मुली स्वरा शिंदे भाग्यश्री बी, दर्शिका पाटील, 17 वर्षाखालील मुले भरमाप्पा दलवाई, भुषण पाटील, प्रकाश एस वाय, मुली वैभवी बुद्रुक, स्मिता काकतकर, नेहा माकने.
भोवरा
प्राथमिक गट प्रथम व्ही एम शानभाग स्कूल, द्वितीय येळ्ळूवाडी प्राथमिक शाळा, तिसरा येळ्ळूवाडी शाळा ब, माध्यमिक गट प्रथम क्रीडा भारती, द्वितीय सिद्धरामेश्वर स्कूल, तिसरा शिवाजी विद्यालय.
गजगे
खुला गट राजश्री सुनिल उघडे जयश्री शिवाजी काकतकर अलका सुनिल बेळगावकर महाविद्यालयीन गट भुवनेश्वरी नाझरे. ऐश्वर्या नेसरीकर मयुरी पिंगट, माध्यमिक मुली अपूर्वा नाईक कुंडेकर श्रेया चौगुले.