
बेळगाव : हिंडलगा कारागृहातून न्यायालयात सुनावणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांना ठेंगा दाखवत फरार झाल्याची खळबळजनक घटना आज बेळगावात घडली. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे. बेळगावातील अनेक पोलीस ठाण्यांना चोरीच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी अब्दुल गनी शब्बीर शेख हा बेळगाव जेएमएफसी न्यायालय आवारातून पळून गेला. पोलिसांच्या उपस्थितीत बेळगाव येथील जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातून आरोपी पळून गेला. त्याला एका खटल्याच्या सुनावणीसाठी टिळकवाडी पोलिसांनी हिंडलगा कारागृहातून जेएमएफसी न्यायालयात आणण्यात आले होते. त्यावेळी तेथील गर्दीचा फायदा उठवत तो फरारी झाला.
एस्कॉर्ट ड्युटीसाठी कमी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे शेख पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी बेळगाव येथील मार्केट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta