
बेळगाव : येथील कॉलेज रोडवरील नामांकित विवेकानंद सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून ऑस्ट्रेलिया येथील अभ्यास दौरा यशस्वी करून आलेली स्नेहा रामचंद्र एडके हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा अध्यक्षस्थानी होते.
दत्ता नाडगौडा यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन स्नेहा हिचा गौरव करण्यात आला.
राज्यभरातून ऑस्ट्रेलियाच्या अभ्यास दौऱ्यासाठी 40 विद्यार्थी विद्यार्थिनींची निवड करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या शेती विभागातर्फे ही निवड करण्यात आली होती. त्यात स्नेहाला संधी मिळाली होती.
सत्काराला उत्तर देताना केलेल्या भाषणात स्नेहाने अभ्यास दौऱ्यात आलेले अनुभव, तेथील विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद, त्या देशाने शेती क्षेत्रात केलेली प्रगती यांची माहिती दिली. ऑस्ट्रेलियात आयुर्वेदाला विशेष महत्त्व दिले जाते. या अंतर्गत वनौषधी यावर विशेष भर देऊन त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा केला, असे तिने सांगितले.
कार्यक्रमाला चेअरमन कुमार पाटील, रामचंद्र एडके, संचालक अरविंद कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी, संकेत कुलकर्णी, किरण धामणेकर, प्रशांत पाटील, सौ. थनुजा प्रशांत पाटील व इतर संचालक उपस्थित होते.
पत्रकार सुनील आपटे यांनी स्वरचित घे अभिवादन राष्ट्रनेत्या ही कविता सादर केली.
सोसायटीच्या कर्मचारी पद्मा बाडकर, सौ. अर्चना दरवंदर व सौ. स्नेहल कुलकर्णी यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रारंभी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पार्चन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
संगीता रामचंद्र एडके हिने भक्तीगीत सादर केले व अरविंद कुलकर्णी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta