Friday , March 6 2026
Breaking News

सीमातपस्वी भाई एन. डी. पाटील यांचा द्वितीय स्मृतिदिन उद्या

Spread the love

 

बेळगाव : सीमाभागाचे आधारवड, सीमातपस्वी भाई एन डी पाटील यांचा द्वितीय स्मृतिदिन बुधवार दिनांक १७ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता तालुका म. ए. समितीच्या कॉलेज रोड येथील (पवन हॉटेलच्या बाजूला) कार्यालयात गांभीर्याने करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला सीमाभागातील समस्त सीमावासीयांनी, मराठी भाषिकांनी, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *