
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी १७ जानेवारी आणी १ जून हे दिवस हुतात्मा दिन म्हणून मोठ्या गांभीर्याने पाळले जातात. गेल्या दोन वर्षांपासून मराठी भाषिकांच्यावर मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू असून सीमाप्रश्न न्यायालयात आहे त्यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावून परिस्थिती जैसे थे ठेवावी असा आदेश दिला होता तरी या आदेशाला कर्नाटक सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावत मराठी भाषकांच्यावर मोठ्या प्रमाणात दडपशाही चालूच ठेवली आहे. आणि महाराष्ट्र सरकार यावर काहीच करत नाही, म्हणून येत्या १७ जानेवारीला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्मा स्मारक मुंबई येथे हुतात्म्यांना अभिवादन करून त्यांनी ह्या चळवळीसाठी दिलेल्या बलिदानाचा महाराष्ट्राला विसर पडला असेल तर त्यांनी सांडलेल्या रक्ताची आठवण करून देण्यासाठी आज आंदोलन केले. तसेच या दडपशाही विरोधात महाराष्ट्र सरकारने तात्काळ केंद्र सरकारची भेट घेऊन या दडपशाहीला पायबंद घालावा, जर कर्नाटक सरकार असच आक्रमक पणे सीमाभागात कानडीकरणाचा वरवंटा फिरवत राहील आणि महाराष्ट्र काहीच न करता गप्प राहिला तर येत्या दोन-पाच वर्षात बेळगाव सह सिमाभागात मराठी भाषा इतिहासजमा होईल. म्हणून आम्ही हात जोडून विनंती करतोय महाराष्ट्र सरकारने तात्काळ देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची भेट घ्यावी आणि सीमाप्रश्न सुटेपर्यंत आम्हाला आमचे मूलभूत अधिकार देऊन माणूस म्हणून शांततेत जगू द्यावं. आणि जर हेही जमत नसेल तर महाराष्ट्रानं सिमाप्रश्नाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.

प्रसंगी बेळगाववरून उपस्थित म. ए. समिती युवा नेते शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सूरज कणबरकर, विजय जाधव, मनोहर हुंदरे, विनायक हुलजी, सचिन दळवी, प्रवीण रेडेकर, श्रीकांत बुवा, रवी निर्मळकर, भागोजी पाटील, किरण मोदगेकर, मोतेश बारदेशकर, वासू सामजी, राजू पाटील, रामा पाटील, सिद्धप्पा तरळे तसेच मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोवर्धन देशमुख, द.मुंबई अध्यक्ष सचिन दाभोळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta