
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्रासाठी १७ जानेवारी १९५६ रोजी बेळगाव येथील झालेल्या आंदोलनात ज्यांनी हुतात्मा पत्करले ते कंग्राळी खुर्दचे मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मी बेन्नाळकर यांचा तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला.
कंग्राळी खुर्दच्या माजी ग्रामपंचायत अध्यक्षा रुक्मिणी निलजकर व माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्या हस्ते लक्ष्मी बेन्नाळकर यांना साडी देऊन तर आरोग्य उपचारासाठी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या हस्ते आर्थिक मदत देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, बी. एस. पाटील, बी. डी. मोहनगेकर, आर. आय. पाटील, आर. एम. चौगुले, लक्ष्मण होनगेकर, मनोहर संताजी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta