
बेळगाव : खानापूर रोड गोवावेस सर्कल येथे आज सकाळी दहाच्या सुमारास मुस्लिम गल्ली अनगोळ बेळगाव येथील सुरया सय्यद (वय 79) ही महिला रस्ता ओलांडत असताना येणाऱ्या भारत पेट्रोलियमच्या केए 22 /1695 क्रमांकाच्या इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरच्या चाकाखाली सापडली. या अपघातात सदर महिलेचे दोन्ही पाय गुडघ्यापासून निकामी झाले. हा अपघात इतका भयानक होता की बघणाऱ्यांचा थरकाप उडाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्या महिलेला आधार देत बसविले व पोलिसांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेला बोलून जखमी वृद्ध महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta