
बेळगाव : सकल मराठा समाज बेळगाव यांच्या वतीने शनिवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३ पर्यंत बेळगाव जिल्हा रुग्णालयासमोर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा योद्धा, मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई येथे सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून बेळगाव सकल मराठा समाज समन्वयक यांच्यातर्फे या उपोषणाचे आयोजन केलेले आहे. बेळगाव तसेच परिसरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta