
बेळगाव : बेळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बेळगावच्या सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्राची प्रचंड मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पत्रकार विकास अकादमीतर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील जत्ती मठात मंगळवार दि. २३ रोजी दुपारी ४.३० वाजता ही शोकसभा होणार आहे. बेळगाव आणि परिसरातील विविध संघ संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार आदींनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष प्रसाद सु. प्रभू यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta