
बेळगाव- येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने येत्या दि. 10 व 11 फेब्रुवारी रोजी हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जयत तयारी सुरू असून शुक्रवारी सकाळी रथयात्रेसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाची मुहूर्तमेढ श्री राधागोकुळानंद मंदिराच्या समोर करण्यात आली.
इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते मुहूर्तमेढ करण्यात आली. “या निमित्ताने अलीकडेच मंदिराची साफसफाई आणि सजावट करण्यात आली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही रथयात्रा मोठ्या उत्साहाने साजरी होणार आहे. या रथयात्रेत दरवर्षीप्रमाणे जगाच्या विविध भागातून येणारे ज्येष्ठ संन्यासीभक्त सहभागी होणार आहेत” अशी माहिती यावेळी भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी दिली. याप्रसंगी बालकिशन भट्टड, नारायण गौरांग प्रभू, राम प्रभू, नागेंद्र प्रभू, अमृत कृष्णप्रभू, शंकरअरण्य प्रभू, देवेंद्र प्रभू, संकर्षण दास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भजन, कीर्तन करून सर्वांना प्रसाद वाटण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta