
बेळगाव : बेंगळुरू येथे कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे
चेअरमन श्री. सुरेश साठे यांनी बेळगावच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून डॉ. सोनाली सरनोबत यांची नियुक्ती केली आहे. एस. सुरेशराव साठे (राज्याध्यक्ष- कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद (नि.), टी. आर. व्यंकट राव चव्हाण (राज्य कोषाध्यक्ष- कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद), यांच्या हस्ते अधिकृत पत्र सुपूर्द करण्यात आले.
टीआर सुनील चव्हाण (प्रदेश सरचिटणीस-कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद), श्रीनिवास मगर (कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद कार्यालय व्यवस्थापक आणि वसतिगृह वॉर्डन), एस. रोहित राव साठे
(कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बंगलोर जिल्हा उपाध्यक्ष) उपस्थित होते. कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद हे कर्नाटकातील मराठा समाजासाठी बंगलोर येथे स्थापन केलेले मूळ मराठा व्यासपीठ आहे. कार्यालय आणि वसतिगृह बेंगलोरमध्ये आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र विशेष युनिट आणि पदाधिकारी आहेत. डॉ. सोनाली सरनोबत या संपूर्ण कर्नाटकातील पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासह इतर सदस्यांनी मान्यवरांचा शाल आणि श्रीराम प्रतिमा देऊन सत्कार केला.
डॉ. सोनाली सरनोबत यांचे नाव कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री. अनिल बेनके (माजी आमदार व उपाध्यक्ष भाजपा कर्नाटक) आणि श्री. दिलीप पवार (उपाध्यक्ष कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बेळगाव) यांनी सुचवले.

डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, “बेळगाव मराठा महिलांचे प्रतिनिधित्व करणे हा सन्मान आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मराठा समाजाच्या शिक्षणासाठी, विकासासाठी आणि उन्नतीसाठी मी सदैव कटिबद्ध असेन. आपल्यावरील विश्वास आणि पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
बेळगावमध्ये सदाशिव नगरमधील 22 गुंठे जमीन माजी मुख्यमंत्री बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री श्री. बी. एस. येडियुराप्पा यांनी दिली आहे. माजी आमदार अनिल बेनके यांनी मराठा भवन बांधण्याची जबाबदारी घेतली आहे. डॉ. सोनाली यांनी या प्रकल्पात मनापासून सहभागाचे आश्वासन दिले आहे. बेळगाव जिल्ह्यात 15 लाख मराठा समाज असून, विखुरलेल्या समाजासाठी करण्याचे काम मोठे आहे. सर्व मराठा समाज बांधवांना एका छताखाली आणून समाजाला बळकटी देण्याचे काम कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेने हाती घेतले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta