
बेळगाव : 14 जानेवरी 1761 पानिपत शौर्य दिवस. पानिपताच्या रनभूमिवर रणमार्तण्ड मराठा. या लढाईत असंख्य वीरानी या हिंदुस्थानाचे भविष्य आपल्या खांद्यावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि वीरता आपल्या पाठीशी ठेऊन या योद्ध्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. शौऱ्याने लढलो नडलो पण मैदान नाही सोडलो. बचेंगे तो और भी लडेंगे असे आपल्या कंठातून शूर वाणी. त्यांच्या मुखातून समोरच्याला धडकी भरवेल. अश्या त्या शुरवीराना आदरांजलीचा कार्यक्रम शिवतेज युवा संघटना बेळगाव यांच्या वतीने पार पाडला. या लढाईत परकीय शत्रूना मराठ्यांची ताकद कळाली. म्हणून अहमदशहा अब्दालीसह परकीय शत्रूनी पुन्हा वायव्य भारतावर आक्रमण करण्याचे धाडस केले नाही. राष्ट्रभक्ती, संघटन, एकी मराठा योद्ध्यांकडूनच शिकावी, असे मत कवठेमहांकाळमधील (जि. सांगली) व्याख्याते सुदर्शन शिंदे यांनी व्यक्त केले. (ता. बेळगाव) शिवतेज युवा संघटनेतर्फे रविवारी (दि. १४) रात्री संभाजी महाराज उद्यानात पानिपत शौर्यदिन कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते.

गोव्यातील पद्मनाभपीठाचे ब्रम्हेषानंदाचार्य स्वामी, एमएलआईआरसीचे कमांडेंट ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी सर, विठ्ठल पाळेकर, दीपक बेळवडी, मल्लेश केदारी, सागर लाखे, रवी वडर, दशरथ भोगुलकर, सुबराव लोहार व्यासपीठावर होते.
ब्रम्हेषानंदाचार्य स्वामी म्हणाले, प्रत्येकाच्या घरी जिजामाता तयार झाल्या तरच शिवबांच्या विचारांचा जागर होईल. पश्चिमात्य संस्कृतीला महिलांनी आवर घालावा. राम हे त्यागाचे व प्रामाणिकपणाचे आदर्श उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, मराठा लाइट इंफेंट्री चे कमांडेंट ब्रिगेडियर जॉयदिप बैनर्जी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. स्वामींची पाद्यपूजा दौलत जाधव यांच्या हस्ते झाली. भुजंग चौगुले यांनी मंत्रपुष्पांजली सादर केली. पाहुण्यांनी छत्रपती शिवरायांच्या मूर्तिचे पूजन केले.
संघटनेतर्फे अध्यक्ष संतोष जैनोजी, विनायक चौगुले, सुहास गोरल यांनी पाहुण्यांचा सन्मान केला.
कार्यक्रमाला असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती. विनायक चौगुले यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta