Friday , March 6 2026
Breaking News

अन्यायाविरोधात चीड असणारा पत्रकार हरपला, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांना आदरांजली

Spread the love

 

बेळगाव : अन्यायाविरोधात चीड असणारा, सर्व सामान्यांबद्दल कळवळा असणारा पत्रकार प्रशांत बर्डे यांच्या लेखणीतून प्रकट होत होता. त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम हीच त्यांना आदरांजली ठरेल, अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांना आदरांजली वाहण्यात आली.
पत्रकार विकास अकादमी आणि बेळगावकरांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांच्या निधनानिमित्त जतीमठ येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे म्हणाले, बर्डे हे समितीशी एकनिष्ठ असणारे पत्रकार होते. त्यांना समिती आणि सीमा आंदोलनाची प्रचंड आस्था होती. यावेळी जेष्ठ पत्रकार जयवंत मंत्री, माजी महापौर विजय मोरे, नेताजी जाधव, प्रकाश अष्टेकर, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक, बेळगाव मीडिया असोसिएशनचे संस्थापक श्रीकांत काकतीकर, गुणवंत पाटील, शिवराज पाटील, रवी नाईक, डि.के. पाटील, कुंतीनाथ कलमनी, प्रकाश भोसले यांनी आदरांजली वाहिली.
प्रशांत बर्डे यांचे बंधू चंद्रशेखर बर्डे, वैजनाथ पाटील, विलास जोशी, संजय घोरपडे, राजू भोसले, प्रा. चंद्रकांत कोलकार, रवींद्र मोहिते, शिवाजी शिंदे,अमृत वेताळ, मनीषा सुभेदार, रमेश हिरेमठ यांच्यासह बहुसंख्य पत्रकार आणि विविध संघ संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रसाद प्रभू यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *