मनोज जरांगे -पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी, सीमाभागातील सर्व पक्षीय मराठा समाजाने एकजुटीने एकत्र येऊन साखळी उपोषणाला पाठिंबा देण्याचे आवाहन
बेळगाव : भारत देशातील विखुरलेल्या समस्त मराठा समाजाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ताबडतोब ओबीसीमध्ये समाविष्ट करावे यासाठी महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाजाचे आंदोलन करत असलेले समाजसेवक श्री. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बेळगाव येथील म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक श्री. अनिल गंगाधर पाटील यांनी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी व उन्नतीसाठी तसेच मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि मराठा समाजाविषयी असणारी आत्मीयता यासाठी ते बेळगाव येथे लाक्षणिक उपोषण करण्याचे जाहिर केले आहे; लवकरच उपोषणाची तारीख जाहिर करण्यात येईल.
याप्रसंगी माजी आमदार परशुराम नंदीहळी, माजी महापौर ॲड. नागेश सातेरी, ज्येष्ठ विचारवंत माजी प्राचार्य डॉ. आनंद मेणसे, माजी महापौर श्री. शिवाजी सुंठकर, ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक गुणवंत पाटील, रणजीत चव्हाण-पाटील, महादेव पाटील, रमाकांत कोंडूस्कर, चंद्रकांत कोंडूस्कर, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. शंकर बाबली, दीपक पावशे, एपीएमसीचे माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव (आप्पा), मराठी साहित्य चळवळीचे निवृत्त प्राचार्य दिलीप चव्हाण, गोपाळराव बिर्जे, माजी नगरसेवक ॲड. अमर यळ्ळूरकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर आणि रवि साळुंखे, अमित देसाई, विकास कलघटगी, सागर पाटील, रमेश रायजादे, कपिल भोसले, नवनाथ खामखर, प्रा. निलेश शिंदे, महेश डुकरे, प्रा. आनंद आपटेकर, माणिक होनगेकर, यल्लाप्पा मुचंडी, भावकान्ना पाटील, विशाल कंग्राळकर, श्रीधर आळवणी, श्रीधर पाटील, अजित पाटील, विजय पाटील, सुधीर करडी, रमेश माळवी, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, शिवाजी शिंदे, शिवाजी कुट्रे, नाना गडकरी, बाळासाहेब देसाई, भाऊ पाटील, नारायण पाटील, उदय पाटील यासह बेळगांव येथील विविध संघटनांचे पदाधिकारी सदस्य, हितचिंतक सकल मराठा समाजाचे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि पुढील उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शविला. यानंतर पुढील उपोषणाला सर्वपक्षीय मराठा समाजातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी असाच पाठिंबा द्यावा, असे आवाहन म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते, समाजसेवक, माजी नगरसेवक श्री. अनिल गंगाधर पाटील यांनी केले आहे.
——————————————————————
माजी नगरसेवक श्री. अनिल गंगाधर पाटील
मराठा समाजाचा इतिहास पाहता मराठा समाजाने मातृभूमीसाठी व देशवाशियांसाठी आपले बलिदान दिले आहे. देशभर विखुरलेल्या मराठ्यांनी वेळोवेळी देशाचे संरक्षण केलेले आहे ते न विसरता ते चिरकाल स्मरणात राहीले आहे; तंजावर ते अटकेपार झेंडे लावणे ही मराठ्यांच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे. मराठ्यांच्या पराक्रमावर व कर्तबगारीवर शिक्कमोर्तब झाले आहे. संपूर्ण देशभरात विखुरलेल्या देशातल्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून आज मराठा समाजाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. सकल मराठा समाजाला शिक्षण, उद्योग, नोकरी, व्यवसाय आणि इतर सर्व क्षेत्रात आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील समाजसेवक श्री. मनोज जरांगे पाटील हे गेले कित्येक दिवस आंदोलन करत आहेत. त्याचप्रमाणे बेळगाव, राज्यासह देशभरातील समस्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी लाक्षणिक उपोषण करणार आहे. माझ्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव येथील सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी एकजुटीने एकत्र यावे आणि हा आरक्षणाचा लढा यशस्वी करावा.