
वडगाव : १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त मराठा सेवा संघाची बैठक झाली आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा सेवा संघ, बेळगाव जिल्हा आयोजित बैठक रविवारी (ता. ४) मराठा सभागृह, गणेश कॉलनी, संभाजी नगर, वडगाव येथे झाली. यावेळी सोमवारी (ता. १९) सकाळी दहा वाजता शिवजयंती साजरी करण्याचे ठरविण्यात आले.
शिवजयंतीनिमित्त मराठा समाजातील विधुर, विधवा, घटस्फोटित महिला व पुरुष मंडळींचा परिचय मेळावा आणि मराठा समाजासमोरील सामाजिक आव्हाने या विषयावर व्याख्यान आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. बैठकीला मराठा सेवा संघ बेळगावचे जिल्हाध्यक्ष किरण धामणेकर, उपाध्यक्ष नारायण सांवगावकर, सचिव मनोहर घाडी, खजिनदार दीपक कोले, प्रवीण कदम, प्रमोद गावडोजी, धाकलु करविनकोप, कृष्णा कातकर, प्रकाश अनगोळकर, आनंद काटकर, किशोर शिंदे, विवेक शिंदोळकर, हणमंत मेलगे आदी समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta