Monday , December 8 2025
Breaking News

यंदाही बेळगावचे महापौर, उपमहापौरपद भाजपलाच मिळणार

Spread the love

 

बेळगाव : लक्ष्मी राठोड किंवा सविता कांबळे यांना बेळगावच्या 22व्या महापौरपदाची संधी मिळणार आहे. यावेळी महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असून भाजपमध्ये हे दोघेच पात्र आहेत.
यावेळी महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव
बेळगावसाठी नवे महापौर, उपमहापौर भाजपने निवडले
केवळ लक्ष्मी राठोड आणि सविता कांबळे एससी उमेदवार 6 फेब्रुवारी 2023 रोजी महापौरपदी शोभा सोमनाचे तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड झाली. त्यांचा कार्यकाळ 5 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाला. 2024 या वर्षासाठी महापौर आणि उपमहापौर पदांचे आरक्षण काही महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. सत्तारूढ भाजपमधील प्रभाग क्रमांक 35च्या नगरसेविका लक्ष्मी राठोड आणि प्रभाग क्रमांक 17 च्या नगरसेविका सविता कांबळे या दोघीच अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गातील पात्र उमेदवार आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपला महापौरपदाची निवडणूक सोपी जाईल, असे गणित आहे. विरोधी बाकावरील काँग्रेसकडे एकही एससी महिला सदस्य नाही. त्यामुळे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वर्षभरापूर्वी बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील आणि अनिल बेनके यांच्या रणनीतीमुळे महापौर-उपमहापौर मराठी भाषिकांच्या मर्जीतले होते. विधानसभा निवडणुकीत मराठी मते आपल्याकडे खेचण्यासाठी या दोन्ही जागा मराठी माणसांना ‘भेट’ दिल्या होत्या.
महापौरपद सामान्य होते. वाणी विलास जोशी, सविता पाटील, दीपाली टोपगे, सविता कांबळे, लक्ष्मी राठोड, वीणा विजापुरे, रेखा हुगार, रूपा चिक्कलदिनी या कन्नड भाषिक नगरसेविकांनी या पदांसाठी कसरत केली. मात्र, मराठी भाषिकांना आकर्षित करण्यासाठी महापौर आणि उपमहापौरपदे दक्षिण विधानसभा मतदारसंघात आणि उपमहापौरपद उत्तर विधानसभा मतदारसंघात देण्यात आले. मात्र, यावेळी महापौरपदासाठी पात्र ठरलेल्या दोन्ही महिला कन्नड भाषिक आहेत. त्यामुळे कन्नड महिला अपरिहार्यपणे महापौर होतील, हे निश्चित.

15 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक होणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत देण्यात आली असून दुपारी 1 वाजता महापौर व उपमहापौर निवड प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक दडपशाहीला जुगारून प्रशासकीय जागेत महामेळावा यशस्वी

Spread the love  बेळगाव : पहाटेपासून अटकसत्र सुरू करून महामेळावा उधळून लावण्याचे कर्नाटकी प्रयत्न हाणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *