बेळगांव : रविवार दिनांक 11/2/2024 रोजी श्री विश्वकर्मा सेवा संघ महिला मंडळाने आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांची उस्फुर्त साथ मिळाली. उपस्थित मान्यवर मीनाताई बेनके आणि विश्वकर्मा समाजाच्या सावंत मॅडम या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर मीनाताई बेनके यांनी या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलतांना एक बहुमूल्य संदेश दिला. तो म्हणजे या हळदी कुंकूवाचे काय महत्व आहे एका स्त्रीच्या जीवनात, आपण देवीच्या रुपात पूजलो जातो याचे उत्तम स्पष्टीकरण करून विश्वकर्मा समाज भगिनींना स्त्री एव्हढी शक्तिमान आणि कर्त्यव्यनिष्ठ कोणीही नाही याची जाणीव करून दिली. जर स्त्रियांनी सुद्धा घर, मुलं आणि आपला संसार संभाळून काहीतरी काम करावं आणि आपल्या अंतर्गत ज्या कला आहेत. त्याचा पुरेपूर उपयोग करून कोणत्याही कार्यात स्त्री ही यशस्वी होऊ शकते. याची जाणीव करून दिली. आपल्याला या कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल श्री विश्वकर्मा सेवा संघाचे आभार मानले.