
बेळगांव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर क्रीडाभारती, आरोग्य भारती, विद्याभारती व पतंजली योग समिती यांच्यावतीने रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इस्त्रोचे सेवानिवृत्त इंजिनियर व अहमदाबाद येथील राष्ट्रीय स्वयंसेवकाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हिरामणी पाटील, क्रीडाभारतीचे राज्याध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक शिंत्रे, पतंजली योग समितीचे किरण मन्नोळकर, ऍड. सुधीर धामणकर, मोहन पत्तार, ज्योती पवार, विद्याभारती जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्योती पवार, बालिका आदर्श शाळेचे मुख्याध्यापक मंजुनाथ गोलीहळ्ळी या मान्यवरांच्या हस्ते भारतमाता फोटो पूजन, व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी अशोक शिंत्रे, मुकुंद किल्लेकर, किरण मन्नोळकर, संगीता कोनापुरे, पुरुषोत्तम पटेल, मोहन बागेवाडी, दीपक पानसरे, बालिका आदर्श शाळेचे मुख्याध्यापक मंजुनाथ गोलीहळ्ळी यांच्या हस्ते अग्निहोत्र करण्यात आले. यावेळी किरण मन्नोळकर, संगीता कोनापुरे यांनी प्राणायाम, कपालभारती व सूर्यनमस्काराचे महत्त्व सर्वांना पटवून दिले विद्यार्थ्यांच्याकडून व पतंजली योग समितीच्या सदस्यांनी व क्रीडाभारतीच्या खेळाडूंनी 108 सूर्यनमस्कार घातले या कार्यक्रमाला संत मीरा, बालिका आदर्श, मुक्तांगण स्कूलसह अनगोळ, भाग्यनगर विद्यानगर, भागातील नागरिकांनी भाग घेतला होता, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती पवार तर चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.
याप्रसंगी क्रीडा शिक्षक उमेश बेळगुंदकर, आनंद पाटील, मयुरी पिंगट, चंद्रकांत तुर्केवाडी, लक्ष्मी पेडणेकर, उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta