
टिळकवाडी : येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन व रथसप्तमी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
उषा दळवी यांनी अग्निहोत्र करून विधीवत मंत्रोच्चार केले.
वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले.
रथसप्तमी भगवान सूर्यनारायण चा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली. सूर्य देवाची उपासना केल्याने आरोग्य उत्तम राहते उर्जा ताकद शक्ती मिळते आयुष्यात सकारात्मक परिणाम होतो. रथसप्तमीलाच सूर्यदेवाने अवतार घेतला होता सोन्याच्या रथावर बसला होता रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे विचार व्यक्त केले.
या दिवसाचे औचित्य साधून 108 सूर्य नमस्कार घालण्यात आले.
यावेळी गीता देशपांडे, उषा दळवी, विजयालक्ष्मी मकेलवार, शोभा दुर्वे, दीपा चौगले, बीना मुनोळकर, उमेश सुपाले, रवि सुतार, अनुजा कारेकर, अश्विनी गोडसे, वर्षा शानभाग, आदी सदस्यांनी सहभागी होऊन 108 सूर्य नमस्कार घालून उत्साह वाढविला.
दत्तात्रय कुरविनकोप यांनी आभार व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta