
बेळगाव : चलवेनहट्टी येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यावतीनं हनुमान चौकात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमांची सरूवात करण्यात आली. शिव मुर्तीचे पुजन बाबु पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन नारायण पाटील तसेच यल्लाप्पा कितवाडकर यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले तर हनुमान मुर्तीचे पुजन मनोहर हुंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिव मुर्ती समोर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य अमृत रेडेकर यांनी श्रीफळ वाढविले तर हनुमान मुर्ती समोर अमर नाथबुवा यांनी श्रीफळ वाढविले. तत्पूर्वी शिवरायांची आरती तसेच ध्येयमंत्र म्हणण्यात आले. यावेळी गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अमृत रेडेकर तसेच युवराज पाटील सह इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन भुषण पाटील यांनी केले तर मारुती पाटील यांनी अभार मानले. यावेळी किरण पाटील, दयानंद हुंदरे, लक्ष्मण बडवानाचे, कृष्णा पाटील, सुशांत पाटील, कनोज बडवानाचे, नितेश नाथबुवा, अदित्य बडवानाचे, सुरुज पाटील, गुंडू पाटील, सचिन पाटील, उमेश पाटील, भावुक हुंदरे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
Belgaum Varta Belgaum Varta