
बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, आणि वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समादेवी गल्ली बेळगाव येथील श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला आज मंगळवार दि. 20 फेब्रुवारी पासून मोठ्या भक्तीमय वातावरणात व मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी प्रमुख पाहुण्यांनी सरस्वती वाचनालय शहापूर बेळगावचे अध्यक्षा सौ. स्वरूपा इनामदार यांच्या हस्ते फीत कापून श्री देवी दरबाराचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी सौ. स्वरूपा इनामदार यांच्या हस्ते श्री समादेवीची आरती करण्यात आली. श्री देवी दरबाराच्या उद्घाटन समारंभाला व्यासपीठावर वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सचिव अमित कुडतुरकर, वैश्यवाणी युवा संघटनेचे अध्यक्ष रोहन जुळवी, रवी कलघटगी, विश्वस्त मोहन नाकाडी, मोतीचंद दोरकाडी, वैशवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. अंजली किनारी, सेक्रेटरी वैशाली पालकर, उपाध्यक्ष वर्षा सटवाणी, उपस्थित होते. प्रारंभी प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर दत्ता कणबर्गी यांनी स्वागतपर भाषण केले. अंजली किनारी व रोहन जुळवी यांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. स्वरूपा इनामदार यांनी कुटुंबातील स्त्री या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी इनामदार म्हणाल्या जन्म लग्न व मृत्यू हे तीन वेगवेगळे टप्पे परमेश्वराच्या हाती आहे. पण मोठ्या भाग्यानेच आपणाला स्त्रीजन्म मिळाला असून कुटुंबातल्या प्रत्येकाचे सुख व आनंद हे स्त्रीवर अवलंबून असते. खरात जर स्त्री व पुरुष एकमेकांना पूरक असते तर घरातले वातावरण आनंदी राहील. प्रत्येक घरातील पती-पत्नीने एकमेकांचे सुखदुःख वाटून घेत त्यांच्या गुणदोषासह एकमेकांचा आदर केला पाहिजे. एखादी मंगलमूर्ती बनवितांना साच्यातील जास्तीचा मातीचा भाग आपण काढून देतो तेव्हाच एक सुंदर मंगलमूर्ती बनते. त्याचप्रमाणे आपापले दोष आपण समजून घेऊन त्या जर आपणच काढून टाकण्याचा प्रयत्न केला. तर जीवन आनंददायी होईल. असे सांगत महिलांना अनेक गोष्टींचे उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. पारंबी उज्वला बैलुर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर पाहुण्यांना खाना नारळाने ओटी भरण्यात आली. व भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सेक्रेटरी वैशाली पालकर यांनी आभार प्रदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta