
बेळगाव : पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी दि. 20-02-2024 रोजी येळ्ळूर गाव व ग्राम पंचायत कार्यालय व ग्राम पंचायत ग्रंथालयला धावती भेट दिली. या भेटी दरम्यान ग्राम देवता चांगळेश्वरी देवीचे दर्शन घेऊन गावकऱ्यांची भेट घेतली.
यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी व गावकऱ्यांनी गावाबद्दल संपूर्ण माहिती आयुक्तांना दिली. येळ्ळूर गाव हे 25000 लोकसंखेचे गाव आहे. येळ्ळूर गावामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. तसेच गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. ते सर्व एकजुटीने व गुण्यागोविंदाने राहत आहेत. येळ्ळूर गावात कोणतेही धार्मिक, सार्वजनिक काम असेल तर सर्व गावकरी कोणताही हेवे दावे न करता एकत्रित येऊन काम करत असतात. येळ्ळूर गाव हे सुसंस्कृत गाव आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिकरित्या जोपासणारे गाव आहे. अशी येळ्ळूर गावाबद्दल सतीश पाटील यांनी माहिती दिली तसेच येळ्ळूर ग्राम पंचायत व ग्राम पंचायत ग्रंथालय, मॉडेल ग्राम पंचायत व ऍक्टिव्ह ग्राम पंचायत तसेच अर्मृत ग्राम पंचायत म्हणून पुरस्कार मिळाला आहे.अशी माहिती आयुक्तांना दिली. तसेच डिजिटल ग्रंथालयबद्दल महिती दिली. हे सर्व पाहून व ऐकून येळ्ळूरकरांचे व येळ्ळूर ग्राम पंचायत चे कौतुक केले. पुढील काळात सुध्दा आशेच कार्यकरण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी एससीपी गंगाधर बी एम, सिपीआय एन. एस. जनगौडा, विभाग पोलीस तसेच माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, परशराम परीट, तसेच एन. डी. पाटील, प्रसाद कानाशिडे, मधु नादूरकर, हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मजुकर, कार्याध्यक्ष अश्विन मालुचे, चांगप्पा मुरकुटे, परशराम पाटील आणि हिंदवी स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते तसेच मधू कुगजी, परशराम घाडी, मुरारी देसाई, प्रशांत नंदीहळ्ळी, नामदेव कदम, यल्लप्पा टक्केकर, सुजित पाटील, हेमंत पाटील, पृथ्वीराज पाटील, विश्वनाथ पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य रमेश धमणेकर, दलित संघटनेचे लक्ष्मण छत्र्यान्नावर, महेश हूव्वानावर, व दलित संघटनेचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ व ग्राम पंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta