
बेळगाव : क्रेडाई बेळगाव, यश इव्हेंट व बेळगाव काॕस्मो राउंड टेबल 237 आयोजित बेल्काॅन व ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचा आज गुरुवार दि. 22 रोजी दुपारी 3 वा. शुभारंभ होत आहे. कर्नाटक क्रेडाईचे अध्यक्ष प्रदीप रायकर आणि क्रेडाईचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल कटारियाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचा प्रारंभ होत आहे.
सदर प्रदर्शन दि. 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान सी पी एड मैदानावर होत आहे. यामध्ये 220 स्टाॅलची मांडणी करण्यात आली आहे.
बेल्कॉन प्रदर्शन स्टेट बँक ऑफ इंडिया, विक्रम टी एम टी, युनियन बँक, बालाजी रेडी मिक्स काँक्रीट एस जे इंडस्ट्रीज, तिरुपती बालाजी मार्बल यांनी प्रायोजित केले आहे.

हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोजगेकर, सेक्रेटरी युवराज हुलजी, खजिनदार प्रशांत वांडकर, इव्हेंट चेअरमन आनंद अकणोजी, उपाध्यक्ष गोपाळराव कुकडोलकर, यांच्यासह राजेश माळी, जयराज माळी, सचिन बैलवाड, अभिषेक मुतगेकर, आनंद तुडवेकर, ज्ञानेश्वर सायनेकर, सुनिल पुजारी, यश इव्हेंट्सचे प्रकाश कालकुंद्रीकर, अजिंक्य कालकुंद्रीकर आणि विनय कदम अहोरात्र झटत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta