
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन व जागतिक मातृभाषा दिनाच्या औचित्याने विद्यार्थी व शिक्षकांच्या स्वरचित कवितांचे कवी संमेलन मराठी विद्यानिकेतन येथे घेण्यात आले.
या संमेलनामध्ये शिक्षक गजानन सावंत, मंजुषा पाटील, बी.जी. पाटील, सीमा कंग्राळकर व स्नेहल पोटे यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. तसेच निवडक 15 विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या.
विद्यार्थ्यांच्या कविता शाळा, जीवन, मैदान, आई यासारख्या विषयांना स्पर्श करणाऱ्या होत्या. जेष्ठ शिक्षक बी.बी. शिंदे यांनी कविता म्हणजे काय? तिचे सादरीकरण कसे करावे? यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रबोधिनीचे सदस्य नीला आपटे, हर्षदा सुंठणकर, मुख्याध्यापक नारायण उडकेकर, शिक्षक शशिकांत धामणेकर, शाहीन शेख, उषा काकतकर, रुपाली हळदणकर, शबाना मुजावर उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रसाद मोळेराखी तर आभार आर्यन पाटील या विद्यार्थ्याने मानले.
Belgaum Varta Belgaum Varta