Friday , March 6 2026
Breaking News

विमान प्रवास झाला, आता होणार जीवाची मुंबई

Spread the love

 

शांताई वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची मुंबईत प्रेमभराने स्वागत

मुंबई : शांताई व्रुद्धाश्रमात आपले जीवन व्यतीत करत असलेल्या आजी आजोबांना घेऊन शांताई वृद्धाश्रमाची टीम विमानाने आज गुरुवारी दुपारी मुंबईला पोहोचली. मुंबईला पोहोचल्यानंतर पंचतारांकित हॉटेल ताजमध्ये आजी-आजोबांचे हर्षभरात सहर्ष स्वागत करण्यात आले. विमानाचा प्रवास आणि पंचतारांकित हॉटेलचे आदरातिथ्याने सारेच आजी आजोबा भारावून गेले. अशा प्रकारचा एक आगळावेगळा अनुभव त्यांच्या जीवनात प्रथमच लाभला. आजच्या विमानाच्या हवाई प्रवासानंतर सलग चार दिवस हे आजी-आजोबा आता जीवाची मुंबई करणार आहेत. विमानतळावर स्वागतासाठी मुंबईचे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अनिल जैन, ह भ प पारस महाराज मुथ्था, संजय मुथ्था, नीलिमा मुथ्था हे जातीने उपस्थित होते.

शांताई वृद्धाश्रमातील आजी- आजोबांच्या सोबत बेळगावहून शांताई वृद्धाश्रमाचे कार्यप्रमुख आणि माजी महापौर विजय मोरे यांच्यासह विजय पाटील, ऐलन मोरे, संतोष ममदापूर, मारिआ मोरे, नागेंद्र प्रसाद, वसंत बालिगा, संतोष बोराडे आदी आले आहेत. पुढील चार दिवस शांताई वृद्धाश्रमातील आजी आजोबा मुंबईतील प्रमुख पर्यटन स्थळे त्याचबरोबर धार्मिक स्थळांना भेट देऊन जीवनातील एक आगळा वेगळा आनंद लुटणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *