Sunday , September 8 2024
Breaking News

क्रेडाई आयोजित बेल्काॅन व ऑटो एक्सपो प्रदर्शनास बेळगावकरांची प्रचंड दाद

Spread the love

 

बेळगाव : येथील सीपीएड मैदानावर गुरुवारपासून सुरू झालेल्या क्रेडाईच्या बेल्कॉन या घरबांधणी संदर्भातील वस्तू प्रदर्शनास आणि यश कम्युनिकेशन्स आयोजित ऑटो एक्स्पो प्रदर्शनास समस्त बेळगावकरांनी काल व आज भेट देऊन समाधान व्यक्त केले. अशा प्रकारचे क्रेडाईतर्फे आयोजित करण्यात आलेले हे सातवे प्रदर्शन असले तरीही असे भव्य प्रदर्शन पहिल्यांदाच भरले आहे. काल पाहुण्यांनीही आयोजकांचे तोंड भरून कौतुक केले.
क्रेडाई बेळगावने बांधकाम उद्योगातील महिलांना सक्षम करण्यासाठी महिला विंग सुरू केलेला आहे. 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान रिअल इस्टेट मालमत्ता, बांधकाम साहित्य आणि अंतर्गत वस्तूंचे हे सर्वात मोठे प्रदर्शन आहे.

क्रेडाई महिला विंग ने आज विविध स्पर्धांचे आयोजन केले. आर्किटेक्चर आणि सिव्हिल विद्यार्थ्यांसाठी फसाड मॉडेल बनवण्याची आणि सस्टेनेबल बिल्डिंग डिझाईन स्पर्धा आयोजित केली.
या स्पर्धेत जैन कॉलेज, अंगडी कॉलेज, एस जी बी आय टी कॉलेज, गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आणि मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून आर्किटेक्ट पद्मा संगोळी आणि वेदवती पाटील यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांनी ऑटो CAD सॉफ्टवेअरवर बिल्डिंग डिझाइनचे अनोखे मॉडेल आणि टिकाऊ संकल्पना सादर केल्या.
या स्पर्धेचे नियोजन महिला विंगच्या आर्किटेक्ट करुणा हिरेमठ, इंजिनीयर अनुश्री बैलूर, आर्किटेक्ट सायली अकणोजी आणि सुकून नूरानी यांनी केले.
हँड्स ऑन रेझिन आर्ट वर्कशॉपचे आयोजन ही आजच केले होते ज्याला राखी वोहरा यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत 45 हून अधिक सहभागी झाले जे शिकण्यास उत्सुक होते आणि ते बनवण्याचा आनंदही घेतला.
चिन्मयी बैलवाड, लक्ष्मी पाटील आणि रेश्मा पोरवाल या समन्वयक होत्या.

उद्या विविध स्पर्धा
24 फेब्रुवारी रोजी चौथी, पाचवी आणि सहावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी दुपारी 3 वा. ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर कराओके ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गायन स्पर्धेचे आयोजन
सायं 5:30 वाजता करण्यात आले आहे. ही स्पर्धा पालक व मूल आणि आजोबा व नातू अशा 2 पिढीसाठी होणार आहे . क्रेडाईच्या महिला विंगने या संपूर्ण कार्यक्रमात भरघोस पाठिंबा दिला आहे. समन्वयक दीपा वांडकर आणि सचिव, करुणा हिरेमठ महिला विंग यांनी संपूर्ण नियोजन केले आहे. सर्व बेळगावकरांनी या स्पर्धामध्ये सहभागी व्हावे तसेच प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोजगेकर, सेक्रेटरी युवराज हुलजी व इव्हेंट चेअरमन आनंद अकणोजी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *