Sunday , December 14 2025
Breaking News

“संजीवनी वृद्धांना आधार”ची वर्षपूर्ती; गरजूंना दरमहा दिले जाते रेशन किट

Spread the love

 

बेळगाव : संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘वृद्धांना आधार’ या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असून दरमहिना हे रेशन किट लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम संजीवनीचे कर्मचारी करत असतात, वर्षपूर्ती निमित्त सर्वच जेष्ठांना फाउंडेशनमध्ये आमंत्रित करून रेशन किट सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी महापौर सरिता पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात जयश्री ढवळी आणि शिल्पा बुदीहाळ यांनी सादर केलेल्या एकदंताय वक्रतुंडाय या गीताने झाली तर मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून उदघाटन करण्यात आले.
सरिता सिद्दी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, डॉ. देगीनाळ यांनी प्रमुख पाहुण्या सरिता पाटील यांना शाल, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले.

प्रास्ताविक करतना सीईओ मदन बामणे यांनी अनेकांनी सढळहस्ते मदत केल्याने हे कार्य सहज शक्य झाल्याचे सांगितले.
गेल्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सुरू केलेल्या संजीवीनी ‘वृद्धांना आधार’ उपक्रमाचा उद्देश हा गरीब आणि उपेक्षित ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुरक्षित करणे आहे. त्यांच्या मूलभूत गरजा, दोन वेळचे जेवण, त्यांना लागणारी औषधे, गरज भासल्यास रुग्णालयाला घेऊन जाणे, कायद्याची मदत अशा अनेक गोष्टी आहेत. त्यापैकीच एक संजीवनी मासिक रेशन सपोर्ट सुरू करण्यात आले असून बेळगावमधील शक्य तितक्या उपेक्षित ज्येष्ठ नागरिकांना लागणाऱ्या मूलभूत साहित्याचे किट प्रत्येक महिन्याला देण्यात येत आहे, असेही मदन बामणे यांनी सांगितले.
प्रमुख पाहुण्या सरिता पाटील बोलताना म्हणाल्या की, अनेक संघटना अथवा वैयक्तिकरित्या कोणत्याही कार्याची सुरुवात केली जाते पण त्यात सातत्य रहात नाही पण संजीवनी फाउंडेशनने सातत्याने आपली वृद्धांना आधार ही योजना सुरू ठेवली आहे हे कौतुकास्पद आहे. अशीच उत्तरोत्तर आपल्या हातून समाजाची सेवा घडत राहो असेही त्या म्हणाल्या.

संजीवनी फाउंडेशनच्या संस्थापिका सविता देगीनाळ यांनी अध्यक्षीय समारोप करतना संजीवनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती देऊन मानसिक रुग्णांसाठीही काळजी केंद्र सुरू केल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित सर्व लाभार्थ्यांना व्यासपीठावरील मान्यवर तसेच विजय पुनगे, डॉ. सुरेखा पोटे, डॉ. नविना शेट्टीगार, यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा शांता मेलगे आणि प्रीती चौगुले यांच्याहस्ते रेशन किट प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मा औशेकर यांनी तर आभार विजयालक्ष्मी पाटील यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

पतीकडून पत्नी आणि कुटुंबियांचा पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

Spread the love  अथणी : पतीच्या घरी झालेल्या भांडणामुळे कंटाळून आपल्या गावी गेलेल्या पत्नी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *