Thursday , March 5 2026
Breaking News

एस. आर. एस. हिंदुस्थान संघ आर. जी. पी. एल. चषकाचा मानकरी

Spread the love

 

राजहंस गल्लीचा राजा संघ उपविजेता

बेळगाव : एस. आर. एस. हिंदुस्थान संघ आर. जी. पी. एल. चषक – 2024 चा मानकरी ठरला असून राजहंस गल्लीचा राजा हा संघ उपविजेता ठरला आहे.

राजहंस गल्लीचा राजा संघाने प्रथम फलंदाजी करत ४ षटकांच्या मोबदल्यात ३ गडी बाद २९ धावा जमवल्या.
प्रतिउत्तरार्थ एस. आर. एस. हिंदुस्थान संघाने अवघ्या ३ षटकातच १ गडी बाद ३० धावा करत विजय संपादन केला.
अंतिम सामन्याचा उत्कृष्ट खेळाडू ठरला उमेश बाळू कुर्याळकर,
तसेच मालिकेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरला गजानन हसबे हा एकूण १० गडी बाद करत पुरस्कार पटकाविला. उत्कृष्ट फलंदाज ठरला तो ओमकार संभाजी जाधव याने एकूण 85 धावा जमविल्या.
नागेश सोमनाचे हा अपकमिंग प्लेयर ठरला. संपूर्ण मालिकावीर ठरला तो उमेश बाळू कुर्याळकर यांने एकूण १३१ धावा व ६ गडी बाद करत मालिकावीराचा मानकरी ठरला.

पुरस्कार प्रदान करताना उपस्थित मान्यवर होते. ते मनोज चावरे, राजू मुधोळकर, रवी येळूरकर, बाळू कुर्याळकर, संदीप मुधोळकर, मल्लाप्पा होळकर व एस. आर. एस. हिंदुस्थान हा विजेता संघ उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *