Friday , March 6 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे आज भव्य कुस्ती मैदान

Spread the love

 

‘बेळगाव केसरी’साठी पै. सिकंदर, पै. गुरुजीत एकमेकांना भिडणार
बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे आज बुधवार दि. 6 मार्च 2024 रोजी भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरविले जाणार असून या मैदानात देशातील अव्वल पैलवानांसह इराणच्या पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत.

हिंदवाडी येथील आनंदवाडीच्या आखाड्यामध्ये होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय निकाली कुस्ती मैदानातील ‘बेळगाव केसरी’ किताबाची कुस्ती युवा नेते राहुल सतीश जारकीहोळी यांनी पुरस्कृत केली आहे. ही कुस्ती पै. सिकंदर शेख कोल्हापूर आणि पै. गुरुजीत मागरोड पंजाब यांच्यात खेळवली जाणार आहे.

‘बेळगाव मल्ल सम्राट केसरी’ किताबाची कुस्ती जयभारत फाउंडेशनने पुरस्कृत केला असून ती पै. माऊली कोकाटे पुणे आणि पै. महदी इराण यांच्यात होणार आहे. या खेरीज ‘दर्शन केसरी’ किताबाची कुस्ती श्रीकांत दादा देसाई व दर्शन देसाई यांनी पुरस्कृत केली आहे. या किताबासाठी उप महाराष्ट्र केसरी पै प्रकाश बनकर विरुद्ध पै हादीझान इराण अशी लढत होणार आहे.

तसेच कर्नाटकचा वाघ पै. कार्तिक काटे विरुद्ध काका पवार यांचा पठ्ठा पै. जयदीप पाटील यांच्यातील कुस्ती चुरशीची असणार आहे. दक्षिण भारतातील यु-ट्युबचा कुस्तीतील जादूगार पै. देवा थापा नेपाळ याची कुस्ती हे या मैदानाचे आणखी एक आकर्षण असणार आहे.

या खेरीज कुस्ती मैदानात इतर 70 काटाजोड लहान -मोठ्या कुस्त्यांचे आयोजन केले जाणार आहे, असे अध्यक्ष सुधीर बिर्जे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *