Friday , March 6 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा पालकमंत्र्यांची येळ्ळूर ग्राम पंचायतीला भेट

Spread the love

 

बेळगाव : 10 मार्च 2024 रोजी बेळगांव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी येळ्ळूर ग्राम पंचायतीला भेट दिली. या भेटीदरम्यान महत्त्वाच्या विषयांवर चर्चा देखील करण्यात आली.
सर्वप्रथम ग्राम पंचायतच्या वतीने बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा शाल आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायतीतील वेगवेगळे उपक्रम तेथील शिस्त आणि सुविधा तसेच ग्राम पंचायतीतील ग्रंथालय आणि तेथील आधुनिक ई बुक सेवा सुविधा यांची पाहणी करून सतीश जारकीहोळी यांनी या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
यावेळी गावातील इतर उपक्रमांविषयी सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच वेगवेगळया समस्यांविषयी चर्चा करून त्या निवारण्या संदर्भात मागणी करण्यात आली. विशेषतः वडगावपासून येळ्ळूरपर्यंतचा जो रस्ता आहे त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांसह सर्वसामान्य हैराण झाले आहेत. तसेच गावातली इतर रस्ते शेतीपर्यंत जाणारे काही रस्ते यांचीही वस्तुस्थिती पाहता संबंधित बांधकाम विभागाकडून लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करण्याची विनंती यावेळी करण्यात आली.. तसेच जलजीवन मिशन योजना आणि एकंदरीत गावातील पाणी टंचाई आणि पाणी समस्येबाबत चर्चा करून यावर तोडगा काढण्याची विनंती जिल्हा पालकमंत्र्यांना करण्यात आली. तसेच गावाच्या विकासासाठी वेगवेगळ्या उपक्रमांवर विवेचन देखील करण्यात आले. त्यामुळे या समस्या जाणून घेऊन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी लवकरात लवकर रस्त्यांचे बांधकाम आणि पाणी समस्या निवारण्यासाठी इतर ठिकाणाहून पाण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात तसेच इतर विकासकामांना लवकरात लवकर सुरूवात करून चालना देण्यात येईल अशी ग्वाही दिली.
यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, पंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, रमेश मेनसे, परशराम परीट, जोतिबा चौगुले, विलास बेडरे, ग्रामपंचायत सदस्या मनीषा घाडी, सुवर्णा बिजगरकर, वनिता परीट व गावातील इतर नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *