
बेळगाव : बिजगर्णी येथील महालक्ष्मी यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. त्याअनुषंगाने रथ बांधणीचे काम बिजगर्णी व कावळेवाडी गावातील सुतार कुटुंबियांनी स्वीकारलेली आहे. दोन्ही गावच्या बैठकीत सुतार कारागिरांना श्रीफळ, पानविडा देऊन काम आकर्षक करण्यासाठी सांगण्यात आले.
यावेळी ग्रामस्थ मंडळाचे चेअरमन वसंत अष्टेकर, ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले
याप्रसंगी वसंत सुतार, रतन सुतार, राजीव सुतार, परशराम सुतार, बाळकृष्ण सुतार, निवृत्त शिक्षक प्रकाश भास्कर, के. आर. भाष्कळ, मारुती जाधव, नामदेव मोरे (वकील), यशवंत जाधव, आपू कांबळे, विष्णू मोरे, पी.डी.ओ, ग्रामीण पोलीस ठाण्याचे काॅन्सटेबल, आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातील सुतार कुटुंबांतील कारागिरांनानी रथ बांधणीचे काम स्वीकारले त्या बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta