Friday , March 6 2026
Breaking News

वैश्यवाणी महिला मंडळातर्फे महिला दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : समादेवी बेळगाव येथील वैश्यवाणी महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर वैश्यवाणी महिला मंडळाच्या संस्थापिका सौ. सुमती कुदळे, विद्याताई मुरकुंबी, संध्याताई कपिलेश्वरी, कमल बापशेट, सुप्रिया बैलूर, वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. अंजली किनारी, सेक्रेटरी सौ. वैशाली पालकर, सौ. वर्षा सटवानी, सौ. सुनिता हणमशेठ, सौ. अक्षता कलघटगी उपस्थित होते. प्रारंभी प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्ष अंजली किनारी यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले.

याप्रसंगी संस्थापिका सुमती कुदळे म्हणाल्या की, 1991 साली समाजातील काही मोजक्याच महिलांना घेऊन महिला मंडळाची स्थापना करण्यात आली होती. आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे याचा मला आनंद होतो. असे सांगत आज पर्यंत वैश्यवाणी महिला मंडळांने अनेक सामाजिक कार्य केले असून आज समाजातील हजारो महिला एकत्र येऊन अनेक उपक्रम राबवत आहेत याचा मला आनंद होतो असे सांगत हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते 1991 ते 2024 पर्यंतच्या सर्व आजी-माजी अध्यक्ष, सेक्रेटरी व खजिनदारांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांसाठी पीक अँड स्पीच ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच महिलांनी अप्रतिम असे नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा हणमशेठ यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली पालकर यांनी केले. या कार्यक्रमाला वैश्यवाणी समाजातील दोनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या. अल्पोपहारांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *