बेळगाव : कर्नाटकातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्वार्थपणे अहोरात्र झटणाऱ्या तसेच हालगा-मच्छे बायपास आंदोलनात अग्रभागी असलेल्या शेतकरी नेत्या जयश्री गुरन्नावर यांचे बुधवार दि. 22/5/2024 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले.
ऊसाला भाव, पिकांना आधारभूत किंमत, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता, नरेगा प्रकल्पाची योग्य अंमलबजावणी, कामगारांना घरे यासाठी जयश्री गुरन्नावर यांचा नेहमी आंदोलनात सक्रिय सहभाग असायचा. जयश्री गुरन्नावर यांच्या निधनाने शेतकरी बांधवांतून दुःख व्यक्त होत आहे.
उद्या गुरुवार दि. 23/5/2024 रोजी दुपारी हिंडलगा सुळगा येथे अंत्यविधी होणार आहे. त्याआधी सकाळी 9.30 वाजता सम्राट अशोक चौक, किल्ला तलाव जवळून अंत्ययात्रा निघणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta