बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. सदर स्थगिती आज उच्च न्यायालयाने उठवली. न्यायालयाच्या या आदेशामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्ता विरोधात मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांनी विविध आंदोलनाद्वारे आपला विरोध दर्शविला होता. शेतकरी रस्त्यावरच्या लढाई सोबत न्यायालयीन लढा देखील देत होते. अलीकडेच या बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकऱ्यांना उच्च न्यायालयातून स्थगिती मिळाली होती. मात्र या स्थगितीच्या विरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता त्या अर्जावर सुनावणी झाली.
दरम्यान, या आदेशामुळे लवकरच हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta