
काटगाळी व देसूर गावात विविध उपक्रम
बेळगाव : सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयच्यावतीने काटगाळी व देसूर गावात तीन दिवसीय “नागरिक प्रशिक्षण शिबिर” आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय कुलकर्णी व किरण मठपती उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. व्ही. हळब होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रशिक्षणार्थींच्या प्रार्थना व स्वागतगीताने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. डाॅ. टी. एम्. नौकुडकर यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथींची मार्गदर्शनपर भाषणे झाली. त्यानंतर संपूर्ण देसूर व काटगाळी गावाची झाडलोट करुन व सडा घालून स्वच्छता करण्यात आली. जनजागृतीपर प्रभातफेरी काढून शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. सायंकाळी शिबिरार्थींनी संगीत प्रा. विनायक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या मध्यवर्ती चौकात समस्त गावकर्यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केले. सुमधूर गायन तसेच नृत्य-नाट्याचा सुंदर कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
दुसऱ्या दिवशी पहाटे 5.30 वा. योग व ध्यान-धारणा प्रात्यक्षिके झाली. संपूर्ण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर एसबीजी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सहकार्याने देसूर व काटगाळी गावातील गावकर्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. दुसऱ्या सत्रात भीमगड येथे भारत विकास परिषदेच्यावतीने डॉ. जनार्दन नाईक, प्रा. अरुणा नाईक व स्वाती घोडेकर यांच्या विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. विनायक मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व प्रशिक्षणार्थी, प्राध्यापक वर्ग, नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta