बेळगाव : चव्हाट गल्ली बेळगाव येथील प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, समाज सुधारक श्री. विश्वासराव नारायणराव धुराजी यांचा अमृतमहोत्सव कार्यक्रम लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.
सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांच्या वतीने विश्वासराव धुराजी यांचे औक्षण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार व तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शहर समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि चव्हाट गल्लीचे सरपंच प्रतापराव मोहिते उपस्थित होते. सुरुवातीला प्राध्यापिका विनोदिनी मुरकुटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विश्वासराव धुराजी यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांनी विश्वासराव धुराजी यांच्या आजवरच्या आठवणींना उजाळा देत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बेळगाव आणि परिसरातील अनेक सामाजिक, संघ संस्था, बँक, सार्वजनिक युवक मंडळे, महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नातेवाईक तसेच हितचिंतकांनी विश्वासराव धुराजी यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच चव्हाट गल्ली जलगार मारुती मंदिर देवस्थान समिती ज्योतिर्लिंग मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने देखील धुराजी यांचा सत्कार करण्यात आला. विश्वासराव धुराजी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध स्तरातील मान्यवर हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वागत कमिटी सदस्य प्रवीण जाधव, उत्तम नाकाडी, चंद्रकांत कणबरकर, किसनराव रेडेकर, सुनील मेलगे, उदय किल्लेकर, ऍड. अमर येळ्ळूरकर, राजेश नाईक, शंकर किल्लेकर, विश्वजीत हसबे यांनी विशेष परिश्रम घेतले.