बेळगाव : रायबाग तालुक्यातील हंदीगुंड गावाच्या हद्दीत चालकाचा कारवरील ताबा सुटून कार विजेच्या खांबाला धडकून कार उलटली यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.
रायबाग तालुक्यातील पलभावी गावातील महालिंग गुरुपद निंगनूर (४७) इराप्पा चन्नाबसू उगारे (३२) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले इमाम राजेसाब सनदी हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर हारुगेरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कार उलटल्याने कार चालक सद्दाम हटलसाब पठाण याने पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे.
हारुगेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.