बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी शाळेचे शिक्षक बी. एम. पाटील यांनी साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे नियोजन उपक्रम प्रमुख शाहीन शेख यांनी केले होते. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळली. हर्ष पावशे, आदिती शिंदे यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकातील गोष्टींचे सादरीकरण केले. यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आता उठवू सारे रान हे गीत सादर केले. बी. एम. पाटील यांनी साने गुरुजींविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक गजानन सावंत, नारायण उडकेकर, सांस्कृतिक विभागाचे शैला पाटील, स्नेहल पोटे, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन आदिती परमोजी हिने केले. तर आभार आरुष सावंत व अनन्या चौगुले यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta