
बेळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संजीवीनी फौंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सुरुवातीला सीईओ मदन बामणे यांनी स्वागत आणि प्रास्तविक करताना शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांती आणि आध्यात्मिकतेमध्ये वाढ होण्यासाठी योग महत्वाचा आहे. भारतीय संस्कृतीचाच एक भाग म्हणून याकडे पाहिले जाते. आज जगभर जागतिक योग दिन साजरा होत असताना संजीवीनी फौंडेशनमध्येही योग दिन साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले.
त्यानंतर मदन बामणे यांनी जेष्ठ योगगुरू डॉ. मुरुगेंद्र पट्टणशेट्टी यांचा स्मृतिचिन्ह आणि तुळसीचे रोपटे देऊन सन्मान केला.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय समुपदेशक लक्ष्मी भेंडवाड यांनी करून दिला.
त्यानंतर डॉ. मुरुगेंद्र पट्टणशेट्टी यांनी योग साधनेबद्दल खूप सारी माहिती सांगून योगा केल्याने मन मस्तिष्क आणि शरीर तंदुरुस्त राहते त्यामुळे प्रत्येकाने योगा हा केलाच पाहिजे असल्याचे सांगून उपस्थितांना विविध योग प्रकार शिकवले आणि नियमितपणे योगसाधना करावी याबद्दल माहिती दिली. ताण तणावाचे प्राणायामच्या माध्यमातून व्यवस्थापन करता येत असल्याचेही त्यांनी सांगितले. उपस्थितांनी योग साधनेमध्ये भाग घेऊन नियमितपणे योगा करण्याबद्दल अभिवचन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मा औषेकर तर आभार सरिता सिद्दी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta