बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य व वि. गो. साठे साठी मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षकांसाठी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेळगाव परिसरातील विविध शाळांच्या शिक्षकांनी सहभागी होऊन आपल्या कविता सादर केल्या. शिक्षकांनी सादर केलेल्या कविता या आशय घन होत्या शिक्षण, शेतकरी, स्त्रीमुक्ती, समानता, बालपण ,आई-वडील, मोबाईल, पाऊस यासारख्या अनेक विषयावर शिक्षकाने आपल्या कविता सादर केल्या. या कवी संमेलनामध्ये शिक्षक कवी बी. जी. पाटील, गजानन सावंत, नारायण उडकेकर, मंजुषा पाटील, माया पाटील, नीला आपटे, स्नेहल हुद्दार, शैला पाटील, शाहीन शेख, कमल हलगेकर, सीमा कंग्राळकर, मुक्ता अलगोंडी या कवींनी सहभाग घेतला. यावेळी प्रबोधिनीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी इंद्रजीत मोरे, हर्षदा सुंठणकर, गौरी चौगुले, धीरसिंह राजपूत, बी. बी. शिंदे यांनी परिश्रम घेतले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन शामला चलवेटकर यांनी केले आभार प्रसाद सावंत यांनी मांडले.