बेळगाव : हेस्कॉमचे मुख्य कार्यकारी अभियंता तुकाराम मजगी यांच्यावर खोट्या विनयभंगाचवगुन्हा दाखल करणाऱ्या १३ जणांना मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. विनयभंगाची तक्रारदार बी. व्ही. सिंधू सह १३ जणांना ३ वर्षे सहा महिने तुरुंगवास आणि प्रत्येकी ८६,००० रुपये दंड ठोठावण्यात आला.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बी.व्ही. सिंधू यांनी हेस्कॉमचे मुख्य कार्यकारी अभियंता तुकाराम मजगी यांच्याविरुद्ध विनयभंग आणि जीवाला धोका असल्याचा गुन्हा दाखल केला. १९ नोव्हेंबर २०१४ रोजी माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तुकाराम मजगी यांना अटक करून तुरुंगात पाठवले. मात्र, पोलिसांनी तपास केला असता सदर तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी कोर्टात ‘बी रिपोर्ट’ सादर केला होता. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एल. विजयालक्ष्मीदेवी यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिला. म्हैसूर बेस्कॉम सहाय्यक अभियंता बी. व्ही. सिंधू, हेस्कॉम सहाय्यक लाईनमन नाथाजी पाटील, सहाय्यक कार्यकारी अजित पुजारी, हेस्कॉम सहाय्यक लाईनमन मलसर्जा शहापूरकर, कनिष्ठ अभियंता सुभाष हुल्लोळी, लाईनमन एरप्पा एम पत्तार, पर्यवेक्षक मल्लिकार्जुन एस रेडीहाळ, वरिष्ठ सहाय्यक भीमप्पा एल गोडलकुंदरगी, हॅस्कॉमचे सहाय्यक लाईनमन राजेंद्र हलंगळी, सुरेश कांबळे, लाईनमन इरय्या गुरय्या हिरेमठ , लाईनमन मारुती भरमा पाटील, हेस्कॉम निवृत्त सहाय्यक द्राक्षायणी महादेव नेसरगी यांना साडेतीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.