Monday , December 23 2024
Breaking News

आंतरराष्ट्रीय खो-खो दिन उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : साधना क्रीडा संघ बेळगाव यांच्यावतीने पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय खो-खो दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री. संजय बेळगावकर होते. याप्रसंगी खो-खो कोच श्री. प्रकाश देसाई, श्री. वैजनाथ चौगुले, श्री. चिन्नास्वामी व श्री. शिवानंद कोरे यांनी आंतरराष्ट्रीय खो-खो दिनाबद्दल शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले. यानतंर वेगवेगळ्या संघाच्या खेळाडूंनी आपल्या संघाच्या खो-खो खेळाचे प्रदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैलेश बांदिवडेकर व ब्रम्हलींग हायस्कूलचे क्रीडाशिक्षक प्रकाश गोरल व शिवाजी गोरल यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला साधना क्रीडा संघाचे सदस्य, खो खो संघाचे खेळाडू, खो-खो प्रेमी तसेच हितचिंतक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश नंदिहळी व आभार प्रदर्शन शैलेश बांदिवडेकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *